लूडो, रम्मी, फँटसी फुटबॉल, क्रिकेटसह ३०० पेक्षा जास्त गेम्स उपलब्ध
मुंबई, 4 मे : देशातील प्रमुख गेमिंग डेस्टिनेशन पेटीएम फर्स्ट गेम्स आता दर महिन्याला आपल्या यूझर्सना बक्षीस आणि रोख रक्कम देत आहे. ऑनलाइन गेम खेळून पैसे कमावण्याकरिता हे एक ‘गो टू अॅप’च्या स्वरुपात उदयास येत आहे. पेटीएम फर्स्ट गेम्समध्ये लूडो, रम्मी, टिक टॅक टो, ब्रेक द बॅक, फँटसी फुटबॉल आणि फँटसी क्रिकेटसह ३०० पेक्षा जास्त गेम्स उपलब्ध आहेत. यूझर्सना घरी बसून बक्षीस आणि पैसा कमावण्याची संधी याद्वारे मिळते. काही बक्षीसं तर थेट यूझरच्या पेटीएम वॉलेट किंवा काही मिनिटात आवडत्या बँक खात्यात जमा होऊ शकतात. दररोज एक लाखाहून अधिक लोक या प्लॅटफॉर्मवर जॉइन होत आहेत.
या अॅपचा इंटरफेस बराचसा यूझरफ्रेंडली आहे. होम स्क्रीनच्या टॉप राइटवर बॅलेन्स आयकॉनवर टॅप करुन ‘अॅड मनी’ पर्याय निवडून पैसे टाकता येतात. हवी ती रक्कम यूझरच्या आवडत्या पेमेंट मोडच्या माध्यमातून ट्रान्सफर केली जाऊ शकते. यात पेटीएम वॉलेट, नेट बँकिंग आणि क्रेडिट/ डेबिट कार्डचा समावेश आहे. यासह हे अॅप यूझर्सना २४/७ कस्टमर केअर सपोर्ट प्रदान करते.
५ दशलक्षांपेक्षा जास्त अॅप डाउनलोडसह पेटीएम फर्स्ट गेम्स हे आधीच भारतातील सर्वात वेगाने विस्तारणारे गेमिंग डेस्टिनेशन बनले आहे. यात बबल शूटर, बाइक रेसिंग, बास्केटबॉल हीरो ८ बॉल पूल आणि जेली क्रशसारखे कॅज्युअल गेम्स मोफत खेळता येतात. यांचे नुकतेच ई स्पोर्ट्स चॅलेंज ‘क्लॅश रॉयल’ मध्ये टूर्नामेंटसाठी ११ हजारांपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन झाले. भारतातील विविध भागांतील स्पर्धकांनी ४ लाख रुपयांची बक्षीसं जिंकण्यासाठी ही स्पर्धा खेळली. गेमप्लेमध्ये ४पट एवढ्या वृद्धीसह पेटीएम फर्स्ट गेम्स भारतीय ई-गेमिंगच्या क्षेत्रात क्रांती करण्यासाठी प्रयत्नरत आहे.