उत्पादनाचा पोर्टफोलिओ विस्तारण्याचे आणि अमेरिका तसेच युरोपमधील बाजारात प्रवेश करण्याचे नियोजन
मुंबई, २८ जुलै २०२१: कोव्हिड-१९ च्या दुसऱ्या दुसऱ्या लाटेने देशाला मोठा धक्का बसला, विशेषत: मागील ३ महिन्यांत, लाखो लोकांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन काँसन्ट्रेटर इत्यादीसारख्या वैद्यकीय उपकरणांची गरज भासली. या पार्श्वभूमीवर, पुण्यातील नोकार्क (Noccarc) या स्टार्टअपने उल्लेखनीय तंत्रज्ञानाच्या भविष्यातील दृष्टीकोनातून सध्याच्या जगातील समस्यांचे निराकरण करण्यास कटिबद्धता दर्शवली. देशातील ५००+ रुग्णालयांत ३०००+, व्ही३१० व्हेंटिलेटर यशस्वीरित्या लावले. देशाच्या सीमा ओलांडत कंपनीने नेपाळमध्येही व्हेंटिलेटर्स लावले. तसेच विविध आफ्रिकी आणि दक्षिण आशियाई देशांकडूनही ऑर्डर मिळवल्या.
महामारीच्या पहिल्या लाटेत ३०० व्हेंटिलेटरचा पुरवठा केल्याने तसेच बाजाराकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्यानंतर देशांतर्गत आणि जागतिक बाजाराकरिता नोकार्कने पुण्यात ५०,००० चौरस फूट परिसरात फॅक्टरी सुरू केली. यामुळे नोकार्कचे व्हेंटिलेटर्सचे उत्पादन मार्च २०२१ मध्ये दररोज २० वरून एप्रिल २०२१ च्या अखेरीस दररोज १०५ पर्यंत पोहोचले. दुसऱ्या लाटेदरम्यान आयसीयू व्हेंटिलेटर्सच्या मागणीत ८०० टक्क्यांनी वाढ झाल्याने केवळ ३ महिन्याच्या कालावधीतच २,५०० व्हेंटिलेटर्सचा पुरवठा केला. तसेच, सर्व व्हेंटिलेटर्स चालू स्थितीत राहतील याची खात्री करण्यासाठी नोकार्कने ऑनलाइन कॉल सेंटर, ऑफलाइन आणि ग्राहक मदत केंद्रही सुरू केले.
नोकार्कचे सह संस्थापक हर्षित राठोड म्हणाले, “वैद्यकीय उपकरणांचे मार्केट ४०० अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचले असताना भारतीय बाजार १० अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचले. २०२५ मध्ये ५० अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत जाण्याकरिता त्यात ३७ टक्के सीएजीआरची वृद्धी होईल, असा अंदाज आहे. नोकार्कच्या टीमने उत्पादन नियोजित मुदतीत पूर्ण केले. पुढील ५ वर्षात मेडिकल उपकरणांची आयात २०% पेक्षा कमी करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. मानवजातीच्या गरजा पुरवणारी उपकरणे तयार करण्यास वचनबद्ध असलेल्या नोकार्कच्या उच्च गुणवत्तेच्या उपकरणांनी भारत आणि इतर देशांत मोठ्या प्रमाणावर स्वीकारार्हता प्राप्त केली आहे. आम्ही जगभरातील रुग्णांच्या गरजा भागवणारी नवनवीन उपकरणे तयार करत राहू.”