~ स्थिर फोटोंचे सर्वोत्तम ‘प्रॉपर्टी व्हिडिओ’मध्ये रूपांतरण करता येणार ~
मुंबई, २८ जून २०२२: ऑनलाइन प्रॉपर्टीचा शोध पूर्णत: एकसंधी अनुभव सादर करण्याप्रती आपली कटिबद्धता कायम राखत नोब्रोकर डॉटकॉम या भारतातील पहिल्या व एकमेव प्रॉपटेक युनिकॉर्नने नुकतेच त्यांचे नवीन वैशिष्ट्य फ्लिक्सर लाँच केले आहे. हे वैशिष्ट्य संभाव्य गृहखरेदीदारांना सर्वात संबंधित माहिती देणारे सर्वोत्तम ‘प्रॉपर्टी व्हिडिओज’ एकसंधीपणे बनवण्यासाठी युजर्सना नोब्रोकर डॉटकॉमवर प्रॉपर्टीज सूचीबद्ध करण्याची सुविधा देते.
भारतातील रिअल इस्टेट बाजारपेठेमध्ये फ्लिक्सरसारख्या वैशिष्ट्याची गरज काही काळापासून दिसून येत आहे. बहुतांश ऑनलाइन सूची स्थिर फोटोंसह येत असल्याने संभाव्य गृहखरेदीदारांना अनेकदा प्रॉपर्टीचे परिमाण योग्यरित्या पाहण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि परिणामी, ते सर्वात माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकत नाहीत. नोब्रोकरचे फ्लिक्सर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्थिर फोटोंचे सर्वोत्तम व्हिडिओंमध्ये रूपांतर करून ही पोकळी भरून काढते. हे वैशिष्ट्य नोब्रोकरवर प्रॉपर्टी सूचीबद्ध करणा-या मालकांसाठी मोफत उपलब्ध आहे.
नोब्रोकर डॉटकॉमचे सह-संस्थापक व सीटीओ अखिल गुप्ता म्हणाले, “रिअल इस्टेट क्षेत्र विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. ही वाढ प्रामुख्याने डिजिटल क्षेत्रात दिसून येत आहे, जेथे आमच्यासारखी व्यासपीठे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांसाठी वाढीव मूल्य निर्माण करण्यामध्ये अग्रस्थानी राहिले आहेत. आमचे नवीन वैशिष्ट्य फ्लिक्सरचे लाँच एकसंधी प्रॉपर्टी खरेदी-विक्री करण्याचा व भाड्याने देण्याचा अनुभव सक्षम करण्याच्या कटिबद्धतेला नव्या उंचीवर घेऊन जाईल. प्रॉपर्टी व्यवहारासाठी लागणारा वेळ कमी करण्याकरिता तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा उद्देश आहे. व्हिडिओ टूर्सचा संभाव्य गृहखरेदीदारांना उत्तम पाठिंबा राहिला आहे. ते विविध प्रॉपर्टीज पाहण्यासाठी प्रत्यक्ष भेट देण्याकरिता लागणारा वेळ कमी करू शकतात. गृहखरेदीदार व्हिडिओ टूरच्या माध्यमातून प्रॉपर्टीचे वास्तविक रूपात मूल्यांकन करू शकतात. फ्लिक्सर घरमालकांना सर्वात उपभोग्य स्वरूपात त्यांच्या प्रॉपर्टीचे प्रमुख विक्री मुद्दे दाखवण्यास मदत करण्यासोबत गृहखरेदीदारांना त्यांच्या स्वप्नवत घराचा शोध घेताना सर्वात योग्य निर्णय घेण्यास सक्षम देखील करेल.”