नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशभर कोविड-19महामारीचा उद्रेक झाला आहे, अशा काळामध्ये आर्थिक परिस्थितीविषयी अनेक अफवा पसरल्याचे निदर्शनास आले आहे. सरकार निवृत्तीवेतनामध्ये कपात करणार आहे किंवा हे वेतन देणे थांबवणार आहे, अशीही एक अफवा पसरत आहे. यामुळे निवृत्ती वेतनधारकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र सरकारपुढे निवृत्तीवेतनात कपात करण्याचा किंवा ते थांबवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे कार्मिक,सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
निवृत्तीवेतनाविषयी यापूर्वीही सरकारने स्पष्टीकरण दिले आहेच. तरीही आत्ता पुन्हा एकदा सरकारने सांगितले आहे की, निवृत्ती वेतनामध्ये कपात करण्याचा विचारही सरकार करीत नाही. निवृत्ती वेतनधारकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या निरामय आरोग्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.