नागपूर : फेसबुक, व्हाटसअॅप ही समाज माध्यमे आज जागतिक राजकारण बदलत आहेत. समाजमाध्यमांकडून आलेल्या पोस्टची कोणतीही खातरजमा न करता आपण ती पुढे पाठवित असतो. अशा अफवा पसरविणाऱ्या पोस्टमुळे समाजातील वातावरण बिघडते. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः तरुणांनी समाज माध्यमांवरील पोस्ट दुसरीकडे पाठविताना (फॉरवर्ड) सद्सदविवेकबुद्धीचा वापर करून त्याची खातरजमा करावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाच्या वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित ‘संसदीय लोकशाही पुढे नक्षलवादी चळवळीचे आव्हान आणि अफवांचे पीक, व्यवस्थेला धोका’ या विषयावरील परिसंवाद श्री. सिंह बोलत होते. यावेळी नागपूर शहराचे सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी नक्षलवादी चळवळीची माहिती दिली.समाज माध्यमांमध्ये फिरणाऱ्या अफवांचे वास्तव विशद करून श्री. सिंह म्हणाले, समाज माध्यमे येण्यापूर्वी अफवा पसरविण्यासाठी व्यक्तिचा थेट सहभाग असायचा व त्यासाठी वेळ लागत असते. मात्र आता तंत्रज्ञानामुळे व सहज उपलब्ध असणाऱ्या समाज माध्यमांमुळे (सोशल मीडिया) काही क्षणात अफवा पसरविता येतात. आज कोणतीही खातरजमा न करता व्हाटसअपवर आलेली पोस्ट पुढे पाठविली जाते. समाजातील महापुरुष, जाती, धर्म, शासनविरु