मालाड (निसार अली) : मालाड रेल्वे स्थानक पूर्वेला सुमारे 15 ते 20 हजार दररोज रिक्षाने ये-जा करतात. अनेक वर्षे ही सेवा सुरू आहे. मंगळवारी 31 जुलै रोजी दुपारी 4 वाजता अचानक कारण नसताना येथे रिक्षा उभ्या करू नयेत, यासाठी अनधिकृत पोल लावण्यात आला आणि रिक्षांसाठी रस्ता बंद करण्यात आला. यामुळे तिथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. यादरम्यान रिक्षाचालकांनी युवासेना कार्यकारिणी सदस्य रूपेश कदम यांच्याशी संपर्क साधला. ते आले असता पोलीस आणि शिवसैनिक तसेच रिक्षा चालकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीचा प्रकार घडला. यानंतर कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तणावामुळे चाकरमान्यांचे हाल झाले