मुंबई, (रुपेश दळवी) : गोरेगाव पूर्वच्या निवारा विद्यालयचे माजी विद्यार्थी १६ एप्रिलला सायं ६ ते रात्री १० या वेळेत “अंकुर – सोहळा विद्यार्थ्यांचा” हा सोहळा साजरा करणार आहेत.
सन १९९९ साली स्थापना झालेल्या निवारा विद्यालयात आतापर्यंत जवळपास १७०० विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे आणि ते आता विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित नृत्यांगना मृणाली सावर्डेकर, गायक सुशांत मोहिते, सायकलिंग मधील राष्ट्रिय पातळी सुवर्ण पदक विजेते अभिषेक आंबडसकर व सिद्धेश आंबडसकर, व्यावसायिक कबड्डीपटू आशिष मोहिते, ताएक्वांडो विशारद सुवर्णा लोहकरे, कबड्डी क्षेत्रातील अभिषेक बागल, अनिता सवर, सोनम सवर, स्नेहा कदम या माजी विद्यार्थ्यांची विशेष उपस्थिती सोहळ्यात असणार आहे. कार्यक्रमामार्फत शाळेतील विद्यार्थी तसेच इतर माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर असे उपक्रम यात राबवले जाणार आहेत.
कार्यक्रमाला नागरी निवारा परिषद विश्वस्त समितीचे श्रीधर शिवराम महाडेश्वर, अमित नेवरेकर, बी. पी. हळदणकर, गिरीश सामंत, तसेच शाळेच्या माजी मुख्याध्यापिका व सध्याच्या विश्वस्त विजया आसबे यांची उपस्थिती असेल. शाळेच्या अधिकाधिक माजी विद्यार्थ्यांनी ह्या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलेले आहे
माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणींना निमंत्रण देणारी डिजिटल निमंत्रण पत्रिका : https://www.facebook.com/Nivar aVidyalaya.MajiVidyarthiSangh/ videos/1656601181312990/