ज्यांनी बाळासाहेबांना बघितले पण नाही, ते आम्हाला आज बाळासाहेबांचे विचार सांगतात – उद्धव ठाकरे
मी घरात बसून महाराष्ट्र सांभाळला, तुम्ही दिल्लीसमोर मुजरे करत बसलात – उद्धव ठाकरे
पूर्वी यांच्या व्यासपीठावर साधू दिसायचे आता संधीसाधू दिसतात – उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
रत्नागिरी,
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज खेडमधील गोळीबार मैदान येथे शिवगर्जना सभा झाली. यावेळी माजी आमदार संजय कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. निवडणुक आयुक्तांना सांगतो मोतीबिंदू झाला नसेल तर खरी शिवसेना बघायला या. हे निवडणूक आयोग सत्तेचे गुलाम असून चुना लावा आयोग असल्याची टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. तसेच शिवसेनेची स्थापना निवडणुक आयुक्ताच्या वडिलांनी नाही माझ्या वडिलांनी केली. तुम्ही मराठी, हिंदूंच्या एकजुटीवर घाव घालतात. भाजपला गल्लीतले कुत्रे विचारत नव्हतं. ज्यांनी सोबत दिली आज त्यांना संपवायला निघालेत त्यांनी प्रयत्न करुन बघावे, अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
मैदानाचे नाव चांगलं आहे, गोळीबार मैदान. ही ढेकणं चिरडायला गोळीबाराची गरज नाही. तुमचे एक बोट मतदानाच्या दिवशी यांना संपवेल. ज्यांना कुटुंबीय मानलं, त्यांनीच आपल्यावर वार केले, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
यावेळी शिंदे गटावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण अंधेरी जिंकलो. नाव चिन्ह घेऊनही आपण जिंकलो. यांच्यात अनेक असे ज्यांनी बाळासाहेबांना बघितले पण नाही, ते आम्हाला बाळासाहेबांचे विचार सांगतात. बाळासाहेबांचे विचार नौकरी, उद्योग बाहेर जाऊ देणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हते असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली.
मी घरात बसून पण महाराष्ट्र सांभाळला तुम्ही दिल्ली समोर मुजरे करत बसलात. माझ्या सोबत महाराष्ट्र होता. आपल जागतिक कौतुक झाले, ते माझे नाही महाराष्ट्राचे कौतुक होते. गुजरातच्या निवडणुका म्हणून महाराष्ट्रातले उद्योग पाठवले. तुटलेल्या एसटीवर गतिमान महाराष्ट्राची जाहीरात करतात. सुविधा नाहीत याची यांना शरम वाटत नाही. महाराष्ट्र हे माझे कुटुंब, म्हणूनच माझं कुटुंब माझी जबाबदारी आहेच. ज्या गतीने तुम्ही कुटुंब बदलले तो गतिमान महाराष्ट्र नकोय, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
तसेच उद्धव ठाकरे म्हणाले की, राजन साळवींचा छळ सुरु आहे, ते देशद्रोही नाहीत.राजन, वैभवची काय संपत्ती आहे? यांच्या मागे का लागता. तसेच देशद्रोही कसे म्हणता? मग सारवासारव करतात. १९९२-९३ साली मुंबई वाचवणारे यांना देशद्रोही वाटतायत. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीचा उल्लेखही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. तसेच पंतप्रधानांना लिहिलेल्या लोकांचे प्रश्न विचारल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. तसेच विरोधातील तुमच्या पक्षात घेतले की ते स्वच्छ होतात. विरोधी पक्षात असले की गुन्हेगार. पूर्वी यांच्या व्यासपीठावर साधू दिसायचे आता संधीसाधू दिसतात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर केली.
मेघालयात शहांनी संगमांवर जोरदार आरोप केले. निकालात संगमांनी यांना चित केले. घराणेशाहीचे, भ्रष्टाचाराचे आरोप केले .आज त्यांच्या सोबत सत्ता स्थापन करताहेत. मग आता भाजपने संगमांचे काय चाटले? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली.
त्यांना भगवे तेज संपवायचे आहे. मी हवा की नको हे जनता ठरवेल निवडणुक आयोग नाही. चोरांना आशीर्वाद देणार का? मिंधेच्या हातात धनुष्यबाण, पण मिंधेचा चेहरा पडलेला. मेरा खानदान चोर है, हे कधीच पुसले जाणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर यावेळी केली.
मी हवा की नको हे तुम्ही ठरवणार निवडणुक आयोग नाही. २०२४ स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नसलेला पक्ष गाडून टाकायचा आहे हा निश्चय करा. नाहीतर २०२४ नंतर आपल्या देशात लोकशाही शिल्लक राहणार नाही. उद्या शिमगा माझ्या सभेनंतर काही शिमगा करतील. संपूर्ण हिंदुस्थानात छत्रपतींचा भगवा आपल्या फडकवायचा आहे, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.