पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज बुधवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आणि देशाच्या राजकरणात एकच भूकंप झाला. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली लालुप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल सत्तेत सहभागी आहे. यादव यांचे पुत्र व राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची सीबीआयने सुरू केलेल्या चौकशीचे निमित्त झाले आणि नितीशकुमार यांनी राजीनामा दिला. अंतरात्म्याच्या आवाजाने मी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी दिली आहे. आता नितीशकुमार यांना पाठिंबा देण्याबाबत भाजपा काय भूमिका घेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.