रत्नागिरी, 12 June : निसर्ग चक्रीवादळात रत्नागिरीच्या दापोली आणि मंडणगड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. या दोन तालुक्यात बाधित झालेल्या कच्च्या पक्क्या घरांची संख्या 26 हजार 354 आहे. यातील 21 हजार 695 घरांचे पंचनामे आज सायंकाळपर्यंत पूर्ण झाले. उर्वरित पंचनामे पूर्ण् करण्यासाठी प्रशासनाने अधिक गती वाढवलेली आहे. जिल्ह्यात पडझड झालेल्या घरांची संख्या 40 हजार 436 इतकी आहे.
मंडणगड तालुक्यात पूर्णत: व मोठ्या प्रमाणावर नष्ट/पडझड झालेल्या घरांची संख्या 1 हजार 500 आहे. यातील 1 हजार 230 घरांचे पंचनामे पूर्ण झाले तर दापोली तालुक्यात हीच संख्या 2 हजार 212 असून यातील 389 घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
अंशत: पडझड झालेल्या घरांची मंडणगड तालुक्यातील पक्कया घरांची संख्या 12 हजार असून यातील 8 हजार 560 घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर कच्च्या घरांची संख्या शून्य आहे.
दापोलीत अंशत: पडझड झालेल्या पक्कया घरांची संख्या 2हजार 212 असून यापैकी 389 पंचनामे पूर्ण झाले तर कच्च्या घरांची संख्या 9 हजार 022 असून त्यापैकी 5हजार 112 पंचनामे पूर्ण झाले आहेत.
जिल्ह्यात नुकसान झालेल्या कच्ची व पक्की घरे व झोपड्यांची संख्या 40 हजार 436 आहे त्यापैकी 26 हजार 365 घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.