
रायगड जिल्ह्यात 3200 हेक्टर क्षेत्रात नारळ लागवड आहे. त्यातील 2500 हेक्टर क्षेत्रातील नारळ झाडांचं नुकसान झालं आहे. रायगडमध्ये सर्वाधिक नारळ झाडांचं नुकसान श्रीवर्धन, म्हसळा, दिवेआगर आणि तळा या भागांमध्ये झालं आहे. रायगडमध्ये झाडं मोडणे, अर्धवट तुटणे, आशा प्रकारचं मोठं नुकसान झालं आहे.
तर रत्नागिरी जिल्ह्यात 5656 हेक्टर क्षेत्रात नारळ लागवड आहे. मात्र 220 हेक्टर क्षेत्रातील नारळ झाडं निसर्ग चक्रीवादळात उद्धवस्त झाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड तालुक्यातच हे सर्वाधिक नुकसान झालं आहे. या दोन्ही तालुक्यांत नारळ झाडं उन्मळून पडण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. या दोन्ही जिल्ह्यांत जवळपास 4 लाख 77 हजार झाडांचं नुकसान झालं नअसल्याची माहिती या समितीतील सदस्य डॉ. वैभव शिंदे यांनी यांनी दिली आहे.सध्या या समितीच्या पाहणीनंतर या संदर्भातील अहवाल तयार होत आहे. मात्र या बागायती उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं आहे. त्याला पुन्हा उभं करायचं असेल तर सरकारने यांच्यासाठी ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.