
मुंबई : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि त्यासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणासाठी दि. २९ व ३० एप्रिल रोजी मंत्रालयातील कामकाज बंद राहणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली.
केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.















