रत्नागिरी (आरकेजी): कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अॅड. निरंजन डावखरे यांनी रत्नागिरी शहर परिसरामध्ये झंझावाती प्रचारदौरा केला. शैक्षणिक संस्था, पदाधिकारी, डॉक्टर्स, सीए यांच्यासह वित्तीय क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या. सत्शिल व उच्च विद्याविभूषित असलेल्या डावखरे यांना या सार्यांकडून पाठिंबा मिळत आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीसाठी आता अगदी कमी दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे भाजपचे उमेदवार अॅड. डावखरे यांनी घरोघरी पोहोचून मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांना रत्नागिरी शहरातून भरघोस पाठिंबा व सहकार्य मिळत आहे. यामुळे त्यांचा विजय नक्की होणार असे कार्यकर्ते सांगत आहेत. अॅड. डावखरे यांच्यासमवेत आमदार प्रसाद लाड, भाजपचे चिटणीस डॉ. विनय नातू, शहरातील पदाधिकारी तसेच या निवडणुकीचे प्रभारी अॅड. दीपक पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते. विविध शिक्षक संघटनांचा सक्रिय पाठिंबा मिळाल्याने डावखरे यांचा विजय नक्की मानला जात आहे. प्रचारादरम्यान विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, तसेच विविध क्षेत्रातील मतदारांकडून उत्स्फूर्त पाठिंबा डावखरे यांना मिळत आहे. विविध समस्या चुटकीसरशी सोडवणारे आमदार म्हणून अॅड. निरंजन डावखरे सुपरिचित आहेत. यापूर्वी त्यांना याच मतदारसंघाचा सहा वर्षांचा दांडगा अनुभव आहे. विधान परिषदेत पदवीधरांचे प्रश्न योग्यरितीने उपस्थित करणारे आमदार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यामुळेच पदवीधरांचा आधारस्तंभ असे त्यांना म्हटले जाते. डावखरे यांचा स्वतःचा असा ठसा आहे. यामुळेच त्यांना रत्नागिरी शहर, परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.