डोंबिवली : मतदार संघातील समस्या जवळून पहिल्या असून त्याच पद्धतीने काम पूर्वीपासून केले आहे. सकारात्मक दृष्टीकोन असल्यामुळे कधीच त्रास झाला नाही. कोकण पदवीधर मतदार संघातून भरघोस मतांनी निश्चित निवडून येईन असा ठाम विश्वास आहे. कै. वसंतराव डावखरे यांची पुण्याई माझ्या मदतीला धावून येईल असे प्रतिपादन विधान परिषदेचे भाजपा उमेदवार निरंजन डावखरे यांनी डोंबिवलीत केले.कल्याण डोंबिवली विभागात विज्ञान शाखेत सर्वप्रथम आलेल्या रॉयल कॉलेजमधील राजस मेहंदळे याने 94.92% गुण मिळवून सलग तिसऱ्या वर्षीही रॉयल कॉलेजची परंपरा कायम राखली. त्याचा विशेष सत्कार करण्यात आला होता. दरम्यान त्या विद्यार्थाचे कौतुक करण्यासाठी निरंजन डावखरे यांनी सदिच्छा भेट दिली त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना आपले मत मांडले.राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे भाजपानेही निरंजन डावखरे यांना कोकण पदवीधर मतदार संघातील उमेदवारी देऊन ही जागा आपल्याकडे खेचण्याचा निश्चय केला आहे. निरंजन डावखरे यांच्या रूपाने भाजपला कोकण पदवीधर मतदार संघात एक चांगला उमेदवार मिळाला आहे. विधान परिषदेवर डावखरे भरघोस मतांनी निवडून येतील अशी चर्चा पदवीधर मतदार संघात असल्याने यांना काय वाटते याविषयी त्यांना पत्रकारांनी छेडले होते.याबाबत ते म्हणाले, सहा वर्षे काम केले असल्याने माझा विजय निश्चित आहे. भाजपची काम करण्याची पद्धत, आणि माझी पुर्वाश्रमिची कामे याचा फायदा होणार आहे. भाजपा आणि परिवार एकसंघ असून पदाविधर मतदार विकासाला साथ देतील.विशेष म्हणजे राष्ट्रवादीसह शिवसेनेचीही मते मलाच मिळणार असे त्यांनी ठासून सांगितले. कारण निरंजन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंत डावखरे यांचे चिरंजीव आहेत. वसंत डावखरे हे अनेक वर्षे विधान परिषदेचे उपसभापती होते. त्यांचे शिवसेनेसह सर्वच पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध होते. त्यामुळे विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांनाच पदवीधर मतदार निवडून आणतील असा त्यांना ठाम विश्वास आहे.