मुंबई : लार्सन अँड टुब्रोचे समूह अध्यक्ष ए. एम. नाईक यांनी स्थापन केलेल्या निराली मेमोरियल मेडिकल ट्रस्टद्वारे नवसारी, गुजरात येथे स्पेशॅलिटी कर्करोग हॉस्पिटल उभारले जाणार आहे आणि टाटा ट्रस्ट्स या सुविधेचे दैनंदिन कामकाज हाताळणार आहेत. निराली मेमोरियल मेडिकल ट्रस्ट आणि टाटा ट्रस्ट्स यांनी यासंदर्भात करारावर सह्या केल्याअसून त्यावेळेस ए. एम. नाईक आणि रतन एन. टाटा उपस्थित होते.
नाईक आणि टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे जन्मगाव असलेल्या नवसारी येथील प्रस्तावित हॉस्पिटलने समाजातील गरजू वर्गाला कर्करोगाशी सामना करण्यात मदत करण्याचे ध्येय ठेवले आहे. हे हॉस्पिटले टाटा समूहाशी संलग्न असलेल्या जमिनीवर उभारले जाईल.
याप्रसंगी ए. एम. नाईक म्हणाले, ‘सामाजिक प्रगती आणि स्वास्थ्यासाठी आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध असणे ही मूलभूत गरज आहे. निराली मेमोरियल मेडिकल ट्रस्ट समाजातीलसर्व वर्गांसाठी आधुनिक वैद्यकीय उपचारांचे फायदे उपलब्ध करून देण्यासाठी बांधील आहे.ट्रस्टचे उपक्रम गरजू रूग्णांना विशेषतः समाजाच्या वंचित घटकांना परवडणाऱ्या किंमतीत मदत करत आहेत. कर्करोगाशी संबंधित विविध उपक्रम हाती घेतल्याबद्दल टाटा ट्रस्ट्सचे नाव देशभरात आदराने घेतले जाते. निराली मेमोरियल मेडिकल ट्रस्ट आणि टाटा ट्रस्ट्स यांच्यात नवसारी येथे स्पेशॅलिटी कर्करोग हॉस्पिटल उभारण्यासाठी भागिदारी झाल्याचा मला आनंद वाटतो.’
रतन एन. टाटा म्हणाले, ‘कर्करोगासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. नाईक यांचा उपक्रम अनुकरणीय असून कर्करोगाशी संबंधित सेवा परवडणारी आणि सहज उपलब्धकरून देण्याबद्दल दूरवरचा पल्ला गाठेल.’
निराली मेमोरियल मेडिकल ट्रस्ट हॉस्पिटलसाठी आधुनिक सेवांसह पायाभूत सुविधा निर्माण करेल आणि प्रगत तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे उपलब्ध करेल, तर टाटा ट्रस्ट्स रूग्णांची काळजी घेण्याची व दैनंदिन कामकाज हाताळण्याची जबाबदारी घेईल.नवसारी येथील सर्वसमावेशक कर्करोग केयर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय पॅथोलॉजी, उच्च दर्जाचे लिनियर अक्सलरेटर, हिस्टोपॅथोलॉजी, बायोकेमिस्ट्री, यूएसजी, डिजिटल एक्स रे आणिमॅमोग्राफीपासून सीटी स्टिम्युलेटर्स, ब्रॅचीथेरपी ओपीडी आणि मोठी ऑपरेशन थिएटर्स यांचा समावेश असेल.