मुंबई, (निसार अली) : बोरिवलीत श्री बोरिवली 27 जैन संघ समाजा च्या माध्यमातून तब्बल 10 हजार किट चे वाटप, गोर गरीब, निराधार आणि गरजू कुटुंबियांना करण्यात आले. 23 मार्च पासून लॉक डाऊन काळात तब्बल 25 हजार किट वाटण्यात आलें आहेत. तहसीलदार व्ही. धोत्रे सह जैन मंदिराचे ट्रस्टी स्नेहल शहा, चंद्रकांत जोशी, अशोक जैन, प्रकाश शाह, दिलीप शाह, बकुल दोशी आणि विवेक शाह आदींनी पुढाकार घेतला.
बोरिवली विभागात एकूण 27 मोठी जैन मंदिरे आहेत. या मंदिराच्या ट्रस्टीनी स्नेहल अमृत लाल शाह यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित पुढाकार घेऊन बोरिवली तालुक्यात जवळपास 4 लाख जेवणाचे किट वाटले. बोरिवली तहसीलदार यांनी केलेली सूचनेनुसार गोर गरीब, रेशनिंग कार्ड नसलेल्या, हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबियांना दैनंदिन जीवनाश्यक वतुंचे वाटप सुरु ठेवण्यात आलें आहे.दररोज जवळपास 500 ते 700 किट वाटण्यात येत आहेत.
“तालुक्यात निराधार, रेशनिंग कार्ड नसलेले, हातावर पोट भरणारे तसेच वंचित कुटुंबियांची जेवणाची सोय व्हावी, यासाठी आम्ही केलेल्या सूचनेनुसार श्री बोरिवली 27 जैन संघाने दैनंदिन जीवनाश्यक वस्तूंचे किट वाटण्यास सुरुवात केली आहे, असे तहसिलदार व्ही. धोत्रे यांनी सांगितले.