रत्नागिरी दि.20:- डॉ. बाळासाहेब कोकण कृषि विद्यापीठांतर्गत मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी येथे 28 सप्टेंबर 2021 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत एनएफडीबी पुरस्कृत निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन या विषयावर तीन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नाव नोंदणीसाठी डॉ. अनिल पावसे 9422430498 व डॉ. सुरेश नाईक 8275454821 मत्स्य संवर्धन विभाग, मस्त्स्य महाविद्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी यांनी केले आहे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम एनएफडीबी च्या नियम आणि अटीनुसार प्रत्यक्ष उपस्थितीत कोव्हीड-19 च्या मार्गदर्शक तत्वानुसार आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षण निशुल्क असुन प्रशिक्षणार्थीची निवड ही महाराष्ट्रातील प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे लाभधारक आणि संभाव्य कोळंबी संवर्धनातून प्रथम येणाऱ्यास प्रथम याप्रमाणे करण्यात येईल. प्रशिक्षणार्थींची संख्या 50 पर्यंत सिमीत आहे. प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सैधांतिक आणि प्रात्यक्षिक वर्गास उपस्थिती आवश्यक असून त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात येईल. या प्रशिक्षण कार्यक्रमात कोळंबी संवर्धन सद्यस्थिती, भविष्यातील वाटचाल संवर्धन, तलाव आराखडा व बांधकाम, कोळंबी बीज निर्मिती तंत्रज्ञान, कोळंबी बीज साठवणूकपूर्व तलाव व्यवस्थापन, कोळंबी खाद्य व्यवस्थापन, आद्य जैवके, प्रजैवके, खनिजे, कोळंबी, आरोग्य व्यवस्थापन, शासनाचे सहकार्य या विषयी विस्तृत माहिती सैधांतिक आणि प्रात्यक्षिक वर्गात देण्यात येईल.














