मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, दूरचित्रवाणी वृत्त वाहिन्यांचे युग सुरू होण्या आधीच दिवंगत भिडे यांनी प्रादेशिक बातम्या आणि त्यातही मराठी वृत्त निवेदनात एक मापदंड निर्माण केला. त्यांचा आवाज व्यक्तीमत्वाप्रमाणेच भारी भक्कम होता. त्यांची वृत्त निवेदनाची, सुत्रसंचलनाची शैली ही त्यांची ओळख बनून घराघरात पोहोचली. मराठी बातम्यांमधील शब्दांचे उच्चारण ते संयमीत सादरीकरण यासाठी ते सदैव लक्षात राहतील. ज्येष्ठ निवेदक प्रदीप भिडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
















