मुंबई : NIIT लिमिटेडने ‘फ्यूचर रेडी टॅलेंट’ या उपक्रमाची घोषणा केली आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या नियमित शैक्षणिक अभ्यासक्रमांसह एका तयार प्रोग्रामद्वारे त्यांचे ज्ञान वृद्धिंगत करण्यास प्रोत्साहीत करणार आहे.
उपक्रमाचा एक भाग म्हणून टीव्ही अभिनेता, व्हिडिओ जॉकी आणि व्हायाकॉममधील ब्रांडेड कंटेंटचा प्रमुख झरक्सेस वाडियाने ठाणे मुंबई येथील NIIT केंद्रावरील तरूणांना ‘नवीन युगातील डिजिटल मार्केटिंग कौशल्य आत्मसात करण्याबाबत मार्गदर्शन केले. भविष्यासाठी आवश्यक कौशल्यांविषयी बोलताना तो म्हणाला, “डिजीटल युगात कौशल्ये सातत्याने विकसित होत आहे आणि NIIT नेमके हेच सांगत असून त्यासाठीच विविध उपक्रम राबवित आहे. आजचा युवक जितका जास्त अद्ययावत राहिल, तेव्हढाच तो जिवनात यशस्वी बनेल. ” डिजिटल जाहिराती आणि ब्रांडेड कंटेंटचे याचे अनुभवही वाडियाने सांगितले.
दरम्यान, सेमिनारचे आयोजन NIIT बोरिवली, दादर आणि अंधेरी पूर्व येथील सेंटर्समध्ये करण्यात येणार आहे. प्रसिद्ध लेखक प्रिया कुमार NIIT बोरिवली केंद्रात ‘ उद्योगांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रचे महत्व’ यावर माहिती देतील. जागतिक उद्योजक आणि वनएनर्जी मीडियाचे मालक राज ब्रार NIIT दादर केंद्रात मार्गदर्शन करणार आहेत आणि उद्योजक रणवीर अलाहबादिया NIIT अंधेरी केंद्रात ‘व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कौशल्य कशी आत्मसात करावीत?’ याबाबत सांगतील.
NIIT भारतातील 26 केंद्रांमध्ये सेमिनारचे आयोजन करणार आहे. करीयरचे महत्व पटवून सांगितले जाणार आहे. करियर शिक्षण व्यवसाय, NIIT लि. चे उपाध्यक्ष क्षितिज जैन म्हणाले की, “आजच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत करीयरचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. मात्र योग्य माहिती आणि नेमक्या मार्गदर्शनाच्या अभावाने अनेकजण गोंधळून जातात. या उपक्रमाद्वारे करियरच्या नवीन शक्यतांबद्दल जागरूकता उत्पन्न करणे आणि तरूणांना आवडीच्या क्षेत्रात आगेकूच करण्याची व विकसित होण्याची संधी प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे.”
एका अहवालानुसार (जागतिक आर्थिक मंच) डिजिटल तंत्रज्ञानातील रोजगार 2018 मधील 17% पासून 2022 पर्यंत 33% पर्यंत वाढणार आहे. भविष्यकालीन उद्योगांतील 4.0 नौकऱ्यांच्या जबाबदाऱ्यांसाठी कुशल कर्मचाऱ्यांची प्रचंड आवश्यकता असणार आहे.