मुंबई : नाईट फ्रँक इंडियाने इंडिया रिअल इस्टेट या महत्त्वाच्या अर्धवार्षिक अहवालाची नववी आवृत्ती आज जाहीर केली. या अहवालामध्ये, जानेवारी – जून 2018 (2018 मधील पहिली सहामाही) या कालावधीतील एमएमआरमधील निवासी व ऑफिस मार्केटच्या कामगिरीचे सर्वंकष विश्लेषण करण्यात आले आहे.
ऑफिस क्षेत्र:
- नव्या ऑफिससाठी जागेच्या पुरवठ्यामध्ये वार्षिक 42% घट
- व्हेकन्सी पातळीमध्ये किरकोळ, 21.5% वाढ
- इच्छित व्यवसाय केंद्रामध्ये ऑफिससाठी दर्जेदार जागेचा अभाव असल्याने व्यवहारांवर मर्यादा, व्यवहारांमध्ये वार्षिक 7% घट
- कमी भाडे असलेल्या व उपनगरी ऑफिस मार्केटचा मोठा हिस्सा असल्याने वेटेड अॅव्हरेज रेंटलमध्ये वार्षिक 8% घट
- ‘अन्य सेवा’ क्षेत्राच्या व्यवहारांमध्ये को-वर्किंगचे प्रमाण 30%
निवासी क्षेत्र:
- आजूबाजूच्या उपनगरांत भव्य प्रकल्प दाखल होणे व बीएमसी परिसरात डम्पिंग ग्राउंडची स्थगिती यामुळे, निवासी क्षेत्रातील लाँचेसचे प्रमाण 2017 मधील पहिल्या सहामाहीतील नीचांकावरून 2018 मधील पहिल्या सहामाहीत वार्षिक 128% वाढले
- मुंबई शहरात (बीएमसी परिसर) डम्पिंग ग्राउंड स्थगितीनंतर पुरवठ्यामध्ये सर्वाधिक वाढ
- सरासरी युनिट आकारामध्ये 2013 पासून 2018 पर्यंत 12% घट
- एमएमआरमध्ये वेटेड अॅव्हरेज प्राइसमध्ये वार्षिक 9% घट, सर्व बाजारांत किमतीत घट
- किमतीत घट होण्याबरोबरच, विकसक विविध सवलती देत आहेत – 24 महिन्यांची भाड्याची हमी, स्टॅम्प ड्युटी माफ व फ्लोअर राइज शुल्क नाही
- निवासी प्रकल्पातील विक्री खोळंबली, 2017 मधील पहिल्या तिमाहीपासून वार्षिक किरकोळ 1% वाढ
- विक्री न झालेल्या इन्व्हेंटरीमध्ये वार्षिक घट 14%. 2014 मधील दुसऱ्या सहामाहीपासून 2017 तील दुसऱ्या सहामाहीपर्यंत लाँचेस विक्रीच्या बाबतीत सातत्याने पिछाडीवर असल्याने, 2017 मधील पहिल्या सहामाहीतील 8.8 वरून 2018 मधील पहिल्या सहामाहीत क्यूटीएसमध्ये 8.0 पर्यंत घट
मुख्य अर्थतज्ज्ञ व संशोधनाचे राष्ट्रीय संचालक डॉ. सामंतक दास यांनी सांगितले, “रेरा व जीएसटी यांची अंमलबजावणी झालेल्या 2017 तील पहिल्या सहामाहीच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील निवासी क्षेत्रातील लाँचेसमध्ये 2018 तील पहिल्या सहामाहीत वार्षिक 128% वाढ झाली. यासाठी प्रामुख्याने, मुंबई शहरातील डम्पिंग ग्राउंडला स्थगिती व आजूबाजूच्या उपनगरांत दाखल झालेलेभव्य प्रकल्प हे घटक कारणीभूत होते. बहुतांश विकसकांनी त्यांचे नवे प्रकल्प दाखल करत असताना अपार्टमेंटचा आकार कमी करण्यावर भर दिला. त्यानुसार, एमएमआरमध्ये सर्वत्र अपार्टमेंटच्या आकारात 12% घट दिसून आली आहे, तर काही प्रीमिअम मार्केटमध्ये 31% इतकी घट झाली आहे. तसेच, सर्व बाजारांत किमतीत किरकोळ घट होण्याव्यतिरिक्त, विकसक ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी अन्य अनेक सवलती देत आहेत.
ऑफिस मार्केट स्थिर असून, सर्व व्यवसाय केंद्रांमध्ये भाड्यात वाढ होत आहे; परंतु, पुरवठ्याचा अभाव असल्याने व्यवहारांच्या वाढीत अडथळे येत आहेत. एमएमआर मार्केटमध्ये व्हेकन्सी रेट अंदाजे 22% आहे, बीकेसी व लोअर परेल अशा इच्छित ठिकाणी दर्जेदार ऑफिसची चणचण असल्याने ऑक्युपायर्सच्या विस्तार योजनांवर मर्यादा येत आहेत.”