रत्नागिरी (आरकेजी) : भंडारी तरुणांच्या संकल्पनेतून साकारलेली जय भंडारी चषक २०१८ ही भव्य नाईट अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धेला १० जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात हे सामने खेळवले जाणार आहेत.
भंडारी समाज दीपावली शुभेच्छा रॅली कमिटी, भंडारी ढोल ताशा ध्वज पथक, भंडारी समाज नारळ लढवणे स्पर्धा कमिटी आणि जय भंडारी चषक स्पर्धा कमिटी यांनी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची १२०० रुपये प्रवेश फी आहे. स्पर्धेच्या नियमांप्रमाणे स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्या बाहेरील दोन खेळाडू चालणार आहेत, सर्वाना ओळखपत्र अनिवार्य आहे. सर्व खेळाडूंना ट्रॅक आणि बूट बंधनकारक आहेत, स्पर्धेचे उर्वरित नियम कमिटीकडे विजेत्या संघास २२ हजार २२२ रुपयांचे पारितोषिक आणि मनाचा भंडारी चषक देण्यात येईल. तर उपविजेत्यास ११ हजार १११ रुपये आणि चषक देण्यात येणार आहे.
त्याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्ष्रेत्ररक्षक, खेळाडूवृत्ती, शिस्तबद्ध संघ, क्रिकेट प्रेमी प्रेक्षक याना हि पारितोषिक देण्यात येणार आहे. तर मालिकावीराला मोबाइलला देण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यातून सामानावीराची निवड केली जाणार आहे. स्पर्धा १० जानेवारी पासून सायंकाळी ६ वाजल्यापासून महाजन क्रीडा संकुल आठवडा बाजार येथे सुरु होणार आहे. अधिक माहितीसाठी ९०९६७५५८५७, ९११२१३७४१४, ८९७५०५०४४४ या क्रमांका वर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे.