मुंबई, ११ जून २०२१: निफ्टी निर्देशांक ०.५२% वाढून १५,८०० ची विक्रमी झेप मागे टाकत १५,८१७ वर पोहोचला आहे, तर सेन्सेक्स ०.५७% वाढून या पूर्वीची ५२,५१६ ची झेप मागे टाकून ५२,५९७ वर पोहोचला आहे. एफआयआय, डीआयआयकडील उत्तम फ्लो आणि रिटेल सहभागाच्या पाठबळावर मार्केटने आजवरचा उच्चांक गाठला आहे. शिवाय कंपन्यांनी ३१ मार्च २०२१ रोजी पूर्ण होणार्या तिमाहीत चांगले उत्पन्न नोंदवले आहे.
एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी रिसर्च असोसिएट श्री. यश गुप्ता यांनी सांगितले की सेन्सेक्समधल्या घोडदौडीचे नेतृत्व अजूनही रिलायन्सकडेच आहे. त्यात १.४% वाढ झाली असली तरी, २३६९ हा आजवरचा उच्चांक त्यांना मोडता आलेला नाही. दुसरीकडे, बीएफएसआय आणि आयटी सेक्टर्सनी आपली गती कायम राखली आहे. एसअँडपी बीएसई एनर्जीने संपूर्ण आठवडाभर घोडदौड केली आहे आणि आज १.४४% वर आहे, एसअँडपी बीएसई इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी १.२४%ने वर आहे आणि एसअँडपी बीएसई मेटल १.१७%ने वर आहे. व्यापक मार्केटमध्ये आम्ही सकारात्मक गतीची अपेक्षा करत आहोत आणि मिडकॅप्स व स्मॉल कॅप्स आपली उत्तम कामगिरी अशीच चालू ठेवतील ही आशा करतो.