मुंबई-7 ऑक्टोबर 2024: कृषी वस्तूंचा आघाडीचा निर्यातदार, एनएचसी फूड्स लिमिटेड (एनएचसी) कंपनीच्या संभाव्यतेबाबत खूप उत्साही आहे. दिनांक 30 जून 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 391% ने वाढून रु. 200.88 लाख तर आर्थिक वर्ष 31 मार्च, 2024 रोजी संपलेल्या वर्षासाठी कंपनीचा निव्वळ नफा रु. 234.74 लाख रुपये होता हे लक्षात घेता कंपनीची ही प्रशंसनीय कामगिरी म्हटली पाहिजे.
दिनांक 30 जून 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत, एनएचसी फूड्सने रु. 7366.12 लाखांसह 75% ची महसूल वाढ नोंदवली असून ईबीआयटीडीए 94% वाढून रु. 336.40 लाखांवर पोहोचला.
या वाढीमुळे उत्साहित झालेल्या बीएसई सूचीबद्ध कंपनीने राइट्स इश्यूसाठी अर्ज केला आहे. एनएचसी फूड्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अपूर्व शाह म्हणाले, “राइट्स इश्यूच्या उत्पन्नाचा वापर कार्यरत भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि काही सुरक्षित कर्जांची परतफेड करण्यासाठी केला जाईल, ज्यामुळे नफा वाढेल”.
मसाले, अन्नधान्य, तेलबिया, डाळी आणि सुकामेवा यासह कृषी वस्तूंच्या निर्यातीत एनएचसी फूड्स जागतिक स्तरावर अग्रेसर म्हणून उदयास आले आहे. “आम्ही अमेरिका, ब्रिटन, चीन, रशिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिकेसह मध्य पूर्व आणि युरोपमधील 30 हून अधिक देशांमध्ये निर्यात करतो,” असे शहा पुढे म्हणाले.
भारतीय निर्यातीतील त्याच्या योगदानाची दखल घेत, भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने एनएचसी फूड्सला थ्री स्टार एक्सपोर्ट हाऊस प्रदान केले आहे. भारत सरकारच्या सखोल छाननीनंतर देण्यात आलेली ही मान्यता कंपनीसाठी निर्यात सुलभतेत अनेक सुविधा आणते.
“गुणवत्ता हमी, दीर्घकालीन ग्राहक संबंध आणि वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ” ही आमची स्पर्धात्मक ताकद आहे. आमच्याकडे आयएसओ 22000:2018, जीएमपी, एफडीए आणि इतरांसह 10 हून अधिक प्रमाणपत्रे आहेत,” असे शहा म्हणाले.
एनएचसी फूड्सच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण वार्षिक सभेत अपूर्व शाह यांनी भागधारकांना माहिती दिली की, कंपनीने विस्तार, विविधीकरणासाठी योजना आखल्या आहेत. तसेच दीर्घकालीन शाश्वत वाढीसाठी डिजिटल तंत्रज्ञानामध्येही गुंतवणूक करत आहे.
भविष्यातील योजनांबाबत शाह यांनी स्पष्ट केले की, “आर्थिक वर्ष 22-23 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 23-24 मध्ये आमची निर्यात विक्री उलाढाल 26% ने वाढली आहे. याकरिता जागतिक उपस्थिती वाढवण्यासाठी नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये भौगोलिक वैविध्य वाढवण्याची आमची योजना आहे. ज्यामुळे बाजारपेठेतील जोखीम कमी करण्यासही मदत होईल. आम्ही लक्ष्यित धोरणे आणि उत्पादन नवकल्पनांद्वारे भारतीय बाजारपेठेत आपले पाय मजबूत करण्याची योजना आखत आहोत.
उत्पादनांत वैविध्य आणण्याबद्दल माहिती देताना शाह म्हणाले की, “आम्ही रेडी टू कूक मसाले आणि मसालेदार मिश्रणे यासारखी विविध उत्पादने सादर करणार आहोत. आरोग्याबाबत जागरूक असलेल्या ग्राहकांच्या गरजा भागविण्यासाठी आम्ही सेंद्रिय आणि आरोग्य-केंद्रित उत्पादने देखील विकसित करत आहोत”.
“डिजिटल परिवर्तनाचा एक भाग म्हणून, अधिक जागतिक आणि देशांतर्गत ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ऑनलाइन उपस्थिती आणि लॉजिस्टिक्स वाढवून ई-कॉमर्सच्या वाढीमध्ये योगदान देण्याची एनएचसीची योजना आहे”, अशी टिप्पणी शाह यांनी केली.
“सामाजिक जबाबदारी असलेली कंपनी म्हणून, एनएचसी पर्यावरणीय उद्दिष्टांशी जुळवून घेण्यासाठी पर्यावरणपूरक उपाय आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देत आहे”, असे शाह म्हणाले.
एनएचसी फूड्स बद्दल
सन 1960 मध्ये स्थापन झालेली एनएचसी फूड्स लिमिटेड (एनएचसी) ही कृषी वस्तूंच्या आघाडीच्या निर्यातदारांपैकी एक आहे. मसाले, अन्नधान्य, तेलबिया, डाळी आणि सुकामेव्याच्या व्यापारी निर्यातीत पारंगत आहे. 30 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात होणारे 3 स्टार एक्सपोर्ट हाऊस हे इंडी बाईट, ईटमोअर आणि साझ यासारख्या काही आघाडीच्या आणि सिग्नेचर ब्रँडसाठी प्रसिद्ध आहे.