नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे आंतरराष्ट्रीय डरबन चित्रपट महोत्सवाबरोबरच तिसरा ब्रिक्स चित्रपट महोत्सव 22-27 जुलै दरम्यान पार पडला. महोत्सवाचा शेवटचा दिवस इंडिया कंट्री डे म्हणून साजरा करण्यात आला.
तिसऱ्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटांनी जिंकलेले पुरस्कार पुढीलप्रमाणे-
1)सर्वोत्तम अभिनेत्री – भानिता दास (व्हिलेज रॉकस्टार्स)
2) सर्वोत्तम चित्रपट – न्यूटन (दिग्दर्शक अमित मसुरकर)
3) विशेष ज्युरी पुरस्कार- व्हिलेज रॉकस्टार्स (दिग्दर्शिका रिमा दास)
या महोत्सवात स्पर्धात्मक विभागात न्यूटन आणि व्हिलेज रॉक स्टार्स हे दोन चित्रपट तर बिगर स्पर्धात्मक विभागात संदीप पामपल्ली यांचा सिंजर आणि जयराज यांचा भणायकम हे चित्रपट दाखवण्यात आले.