मुंबई, 20 ऑगस्ट : कार्गो पार्सल गाड्या व मालगाड्या हाताळण्यासाठी मुंबई विभागानं १८.८.२०२० रोजी भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवर नवीन पार्सल व वस्तूंचे शेड सुरू केले आहे. याशिवाय मुंबई विभागातील कल्याण आणि तळोजे पांचनंद आगार हे पार्सल कार्गो एक्सप्रेस गाड्यांच्या हाताळणीसाठी आधीच खुले करण्यात आले आहेत.
गुड्स व पार्सलसाठी भिवंडी शेड उघडल्यानंतर रेल्वेच्या वाहतुकीला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे कारण या भागात अनेक गोदामे तसेच जवळच एमआयडीसी क्षेत्र आहे.
मध्य रेल्वे देखील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) -शालीमार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) – चेन्नई सेंट्रल पार्सल विशेष ट्रेन ३१.१२.२०२० पर्यंत पार्सल कार्गो एक्सप्रेस ट्रेन हाताळण्यासाठी चालवित आहे.
लॉकडाऊनपासून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ३४५ पार्सल गाड्या चालविल्या आहेत आणि ९,४३६ टन पार्सल आणि इतर वस्तूंची वाहतूक केली. यामुळे आतापर्यंत ४.२३ कोटी रुपयांची कमाई झाली आहे.
मध्य रेल्वेवर विभागीय स्तरावर मल्टीडिस्प्लेनरी बिझिनेस डेव्हलपमेंट युनिट (बीडीयू) ची स्थापना केली आहे. वरीष्ठ अधिका-यांचा समावेश असलेला हा युनिट रेल्वेत अधिक वाहतूक निर्माण करण्यासाठी व्यापार आणि उद्योगाशी वारंवार संवाद साधतो. मुंबई विभागातून रेल्वे वाहतुकीला चालना देण्यासाठी वस्तू व पार्सलसाठी भिवंडीत शेड सुरू करणे हा एक बीडीयूच्या पुढाकाराने झालेला उपक्रम आहे.