मुंबई : ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या व्यवसायांच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओसह गोदरेज अँड बॉयसने जीवनशैलीशी निगडित व्यवसाय क्षेत्रातअग्रणी स्थान मिळवले आहे. गोदरेज अँड बॉयसच्या कार्यकारी संचालक न्यारिका होलकर यांनी ‘वन गोदरेज’ या नवीन व्यापार धोरणाची घोषणा केली. युअँडअस ब्रँडअंतर्गत हे नवीन धोरण राबवून ही कंपनी घरगुती सुविधा उद्योगात आपले स्थान अधिक बळकट करेल. या सेंटर्समध्ये ग्राहकांना गोदरेज अँडबॉयस उद्योगसमूहातील सर्व घरगुती उत्पादने, सेवासुविधा यांचा लाभ एकाच ठिकाणी घेता येईल. या नवीन धोरणांतर्गत पुढील ३ वर्षात ५० कोटी रुपयांचीगुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे.
‘वन गोदरेज’ ही नवीन रिटेल संकल्पना आधुनिक ग्राहकांसोबतचे नाते अधिक घनिष्ठ करण्यासाठी व युअँडअसचे तज्ञ इंटिरियर डिझायनर्स व प्रोजेक्टमॅनेजर्सच्या टीमने बनवलेल्या घरगुती सुविधांच्या संपूर्ण श्रेणीला एकत्रित स्वरूपात एकाच ठिकाणी उपलब्ध करवून देण्यासाठी उपयुक्त ठरेल. २०२५सालापर्यंत ५० सेंटर्सच्या विस्तारित नेटवर्कच्या माध्यमातून देशातील २० प्रमुख बाजारपेठांमध्ये प्रवेश करून आपले स्थान मजबूत करण्याची योजनायुअँडअसने बनवली आहे. आर्थिक वर्ष २०२० पर्यंत ७ बाजारपेठांमध्ये ७ मोठे ‘वन गोदरेज’ एक्सपिरियन्स सेंटर्स सुरू होतील. अशाप्रकारे आर्थिक वर्ष २०२५पर्यंत आपले उत्पन्न १००० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्धिष्ट युअँडअसने आखले आहे.
गोदरेज अँड बॉयसच्या कार्यकारी संचालक न्यारिका होलकर यांनी सांगितले, “आम्ही आमच्या ग्राहकांचे विचार व त्यांच्या प्रतिक्रियांवर गांभीर्याने विचार केला वआम्हाला असे आढळून आले की, घरगुती सुविधांसाठी सर्वसमावेशक असे स्थान उपलब्ध करून दिल्यास ग्राहकांना अधिक जास्त मूल्य आम्ही देऊ शकतो. ग्राहकांच्या आववश्यकतांनुसार जरुरी उत्पादने व सेवा देणाऱ्या आमच्या समूहातील सर्व व्यवसायांना त्यांच्या चॅनेल्सना एकत्र करून युअँडअसमध्ये ‘वनगोदरेज’ या धोरणाखाली त्यांना एकत्रित केले आहे. १२० वर्षांपासून आमचा समूह घरगुती इंटिरियर व ड्युरेबल्स बाजारपेठांमध्ये अग्रेसर आहे. ग्राहकांची आवड, आवश्यकतांवर ध्यान केंद्रित करत, नूतनीकरणावर भर देत आम्ही पुढील तीन वर्षात या श्रेणींमधून २५% सीएजीआर मिळवू शकू अशी आशा आहे.”
आर्किटेक्ट्स व डिझायनर्समार्फत अद्वितीय सेवा प्रदान करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत इंटेरिओ डिव्हिजनचे सीओओ व बिझनेस हेड अनिलमाथूर यांनी सांगितले की, “आमच्या सर्व कन्ज्युमर ड्युरेबल्स व्यवसायांच्या क्षमता एकत्र करण्याच्या संधीतून ‘वन गोदरेज’ या संकल्पनेची निर्मिती झालीआहे. आमच्या सर्व उत्पादनांना वन स्टॉप होम सोल्युशन्स म्हणून ग्राहकांसाठी उपलब्ध करवून दिले जाईल. आम्ही अशी आशा करतो की, या नवीन व्यापारधोरणामुळे आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत युअँडअसची एकूण आर्थिक उलाढाल १००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल.”
भारतात फर्निचर बाजारपेठेत ऐतिहासिक तेजी आली आहे. अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत असल्यामुळे लोकांकडे खर्च करण्यायोग्य पैशांचे प्रमाण वाढलेआहे, ज्यामुळे ब्रँडेड फर्निचरच्या विक्रीला चालना मिळाली आहे. भारतात फर्निचर क्षेत्राची एकूण आर्थिक उलाढाल ५०००० करोड रुपये आहे. त्याचाच एक भागअसलेल्या गोदरेज इंटेरिओ या रिटेल फर्निचर कंपनीने मागील तीन वर्षात भारतात सर्वत्र २००० हुन अधिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यश मिळवले आहे. त्यांच्या सीएजीआरमध्ये १५टक्क्यांची वाढ झाली आहे, तर उद्योगातील वाढ फक्त ७-८ टक्के आहे. हा उद्योगसमूह घर व कार्यालये या दोन्ही फर्निचरविभागांमध्ये कार्यरत असून आपल्या पेटंटेड अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत नवनवीन संकल्पना वापरून इंटिरियर इको-सिस्टिम व अनुभव निर्माणकरत आहेत. युअँडअसने आपल्या नवीन धोरणाच्या माध्यमातून ग्राहक अनुभवांना वाढवण्यासाठी तंत्रज्ञानामध्ये १० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केलीआहे.