मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या वडाळा आगार येथे अत्याधुनिक बसगाड्यांचा लोकार्पण सोहळा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला. बेस्टने मे. टाटा मोटर्सकडून ३०३ गाड्यांची खरेदी केली आहे. त्यापैकी ७५ गाड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत.
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उप महापौर हेमांगी वरळीकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, खासदार राहुल शेवाळे, आमदार सुनील शिंदे, सदा सरवणकर, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, सभागृह नेता यशवंत जाधव, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर, शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर, बेस्ट समिती सदस्य राजेश कुसळे, हर्षद कारकर, सुहास सामंत, नगरसेवक सर्वश्री सचिन पडवळ, प्रल्हाद ठोंबरे, वसंत नकाशे, टी. एम. जगदीश, अमेय घोले, नगरसेविका स्मिता गावकर, नेव्हर मारियाम्मा, वणू, तसेच उर्मिला पांचाळ, मनीषा कायंदे आणि बेस्टचे अतिरिक्त महाव्यवस्थापक संजय भागवत आणि अन्य वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.