निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्यावतीने कोकण रेल्वेचे रिजनल रेल्वे मॅनेजर रवींद्र कांबळे यांना रत्नागिरी येथे आमरण उपोषणचे निवेदन
मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर ) : नेत्रावती, मत्स्यगंधा एक्सप्रेस संगमेश्वर रोड स्थानकात थांबा संदर्भात २६ आणि २७ जानेवारी २०२२ ला बेमुदत उपोषण झाले. तेव्हा कोकण रेल्वेने थांबा संदर्भात सकारात्मक प्रस्ताव पाठवू असे आश्वासन दिले होते.या गोष्टीला आज ६ महिने झाले तरी थांबा दिला नाही.म्हणून निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्यावतीने कोकण रेल्वेचे रिजनल रेल्वे मॅनेजर रवींद्र कांबळे यांना रत्नागिरी येथे भेटून १५ ऑगस्ट २०२२ ला आमरण उपोषण करणार असल्याचे पत्र पुन्हा देण्यात आले. यावेळी ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन, संजय मालप, संतोष पाटणे,सुशांत शेठ कोळवणकर, गुरुप्रसाद भिंगार्डे ,ओंकार लोध ,अमोल शेट्ये ,संतोष खातू ,स्वप्नील नारकर विशेष सहकार्य देणारे दीपक पवार, जगदीश कदम, गणपत दाभोलकर, नरेंद्र खानविलकर, मुकुंद सनगरे,संजय म्हपुस्कर,प्रसाद नागवेकर, वसंत घडशी, शांताराम टोपरे आदी मान्यवर उपस्थित होते.