मुंबई, (निसार अली) : युवा शक्ती सेनेच्या वतीने आज मालवणी येथे मोफत नेत्रचिकित्सा आणि मोतीबिंदू तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एलएम हॉस्पिटलच्या डॉ. लता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर झाले. १३ जण मोतीबिंदू सदृश आढळल्याने त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार करून देण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी युवा शक्ती सेनेचे अध्यक्ष असिफ शेख, उपाध्यक्ष रबनवाज अन्सारी, हमीद शेख, अजीज पटेल, सोहेल किरकिरी, आफताब शेख, दानीश शेख, इकबाल शेख, सलीम अन्सारी आदीनी पुढाकार घेतला.