मुंबई, ता.6 (प्रतिनिधी) : “तुम मुझे खून दो,मैं तुम्हे आज़ादी दूंगा” हा नारा देणारे भारताचे थोर स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे सिंगापूर येथील युद्ध स्मारक दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रजांनी उदध्वस्त केले होते. ही बाब लक्षात घेता मुंबई येथील वांद्रे पश्चिम इथे वास्तव्यास असलेले इतिहासप्रेमी डॉ. विनोद रोशन डिसोजा यांनी सिंगापूर येथील सांस्कृतिक मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून, ई-मेल द्वारे पाठपुरावा करून सदरील युद्ध स्मारक पुन्हा स्थापित करण्यासाठी प्रयत्न केले होते, त्यांच्या पत्रव्यवहाराची दखल घेऊन सिंगापूर सरकारने ते स्मारक पुन्हा नव्याने उभे केले आहे.
डॉ. विनोद रोशन डिसोजा यांनी यापूर्वी सुद्धा थेट इंग्लंडशी पत्रव्यवहार करून मयूर सिंहासन,छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखे आदींची मागणी केली आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या 60 सैनिकांनी युध्दात सहभाग घेतला होता. त्यामधून जवळपास 26 हजार सैनिकांनी युध्दात आपल्या प्राणाची आहुती दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ सिंगापूर येथे हे स्मारक बनविण्यात आले होते ज्याला 1945 साली इंग्रज अधिकारी लॉर्ड माऊंट बेटन याने नष्ट करण्याचे आदेश दिले होते. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या सैन्याशी निगडित हे एकमात्र स्मारक आहे जे सिंगापूर येथे आहे.- डॉ. रोशन डीसोझा