रत्नागिरी : कॅशलेस व्यवहार करत असताना आपल्या बँक व्यवहारासंबधीची माहिती इतरत्र जाऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. आजच्या स्थितीत नेट बँकीगमुळे सर्व व्यवहार सोपे झाले आहेत. मात्र, हे व्यवहार करतांना काळजीपूर्वक करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी जयकुमार फड यांनी सांगितले. जागतिक ग्राहक दिनानिमित्त डिजिटल युगातील ग्राहकांचे अधिकार या विषयावर जिल्हा पुरवठा कार्यालय येथे कार्यशाळा घेण्यात आली.
आपल्या ए.टी.एम.चा पिन नंबर स्वत: पुरताच मर्यादित ठेवा. शक्यतो नेहमी वापरात येणार्या संगणकावरच व्यवहार करावा. यामुळे फसवणूक होणार नाही. तरीही फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच जवळच्या सायबर क्रॉइममध्ये तक्रार नोंदवावी असेही फड म्हणाले. विजय शेटे, पत्रकार सुकांत चक्रदेव, शोभना कांबळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.