सौंदर्य आणि अभिनय क्षमतेच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत आपली विशेष ओळख निर्माण करणारी नेहा महाजन या अभिनेत्रीने नुकताच एक हटके फोटोशुट केला आहे. गडद निळ्या रंगाचा गाऊन परिधान केलेल्या फोटोशूटमध्ये नेहाचे व्यक्तिमत्व अधिक उठावदार दिसत असून, नेहाचा हा ‘रॉयल’ लुक तिच्या चाहत्यांसाठी देखील विशेष ठरत आहे. आतापर्यत विविधांगी भूमिकेतून लोकांसमोर आलेल्या नेहाचा या रॉयल फोटोशूटला सोशल साईटवर भरभरून प्रतिसाददेखील मिळत आहे.