मुंबई : एनसीआर कॉर्पोरेशन (NYSE: NCR) या जगभरात आघाडीवर असणाऱ्या कंपनीने सीएक्सबँकिंग या सेवेचा शुभारंभ केला. भारतातील वित्तसंस्थांना (फायनान्शिअल इन्स्टिट्यूटशन्स–एफआय) डिजिटल आणि बहुमाध्यम प्रणालींचा अवलंब करत पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. त्याचवेळी वित्तसंस्थांच्या सेवांचा वेग वाढवणे, डाऊनटाइम कमी करणे आदी उद्दिष्टेही साध्य केली जाणार आहेत.
या सेवेच्या अनावरणप्रसंगी ‘बँक–इन–अ–बॉक्स’ या संकल्पनेतून एनसीआरच्या सीएक्सबँकिंग पोर्टफोलिओची माहिती देण्यात आली. यावेळी १०० हून अधिक बँकाचे अधिकारी उपस्थित होत्या. एनसीआरच्या ग्राहकांना प्रत्यक्ष सादरीकरणातून एनसीआरच्या नव्या बहुमाध्यम बँकिंग पर्यायांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधीही देण्यात आली.
तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर वापरकर्त्यांना नेहमीच केंद्रस्थानी ठेवणारी तत्वे यामुळे ‘बँक–इन–अ–बॉक्स’ या संकल्पनेत नाविन्यपूर्ण स्वयंसेवा (सेल्फ सर्विस) पर्यायांसोबतच भविष्यातील परस्परसंबंधांवर आधारित व्यवहारांना वृद्धिंगत करण्यासाठी समकालीन डिझाइन आणि युझर्स इंटरफेसचा वापर करण्यात आला आहे.
“ग्राहकांना आपल्यसोबत जोडून ठेवणे आणि कायम उपलब्ध असणारी बँकिंग सेवा म्हणून टिकून राहणे, हा आजघडीच्या व्यवहारांमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या बाबतीत नाविन्यता पुरवण्यात एनसीआर आघाडीवर आहे,” असे एनसीआर कॉर्पोरेशन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक नवरोज दस्तूर म्हणाले.