रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरीची जिल्हा कार्यकारिणी बैठक जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर व जिल्हा निरीक्षक बबनराव कनावजे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सदर बैठकीला ९ तालुक्यात गाव तिथे शाखा, तालुका कार्यकारिणी, शहर कार्यकारिणी, बुथकमिटी, ५ विधानसभा मतदारसंघाचा आढावा तसेच महाविकास आघाडी संदर्भात चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार रमेशभाई कदम, प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये, प्रदेश सरचिटणीस बारक्या शेठ बने, प्रदेश सचिव बशीर मुर्तुजा, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश शिवगण, प्रदेश सचिव अमोल शिरसेकर, महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता तांबे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजन दादा सुर्वे, ओबीसी जिल्हाध्यक्ष सिध्देश शिवलकर, रत्नागिरी विधानसभा क्षेत्राध्यक्ष राजेंद्र महाकाळ, युवक विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष संकेत कदम, युवक जिल्हा कार्याध्यक्ष नौसीन काजी, जिल्हा खचिनदार रणजीत शिर्के, खेड-दापोली-मंडणगड विधानसभा क्षेत्राध्यक्ष अमित कदम, जिल्हा उपाध्यक्ष अनंत उर्फ बाबू जाधव, चिपळूण विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, देवरूख शहर अध्यक्ष निलेश भूवड, तालुका अध्यक्ष बावा साळवी, जिल्हा उपाध्यक्ष मोहन वनकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण लवंदे, चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, दापोली तालुका अध्यक्ष सचिन तोडणकर, दापोली शहर अध्यक्ष ऍड खलील डिमटीमकर, लांजा तालुका अध्यक्ष अनंत आयरे, रत्नागिरी शहर अध्यक्ष निलेश भोसले, वासुदेव सुतार, खेड शहराध्यक्ष प्रणव मापुस्कर आदी पदाधिकारी उपस्थितीत होते.