दादर : दादर येथील कीर्ती महाविद्यालय येथे 5 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन अंतर्गत दि. १८ आक्टोंबर २०२१ ते २२ आक्टोंबर आणि २५ आक्टोंबर २०२१ या कालावधीमध्ये एनसीसीचे वार्षिक प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. कोरोना महामारीमुळे एन सी सी कैडेटस ना ‘बी’ व ‘सी’ सर्टिफिकेट परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या कॅम्पची अडचण येऊ नये म्हणून विभाजित स्वरूपात सदर कॅम्पचे आयोजन कीर्ती काॅलेजमध्ये केले गेले. मुलींची सुरक्षितता लक्षात घेऊन ५ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर विशिष्ट सेवा मेडल प्राप्त कर्नल ए. डी. स्वामी स्वतः ग्राऊंडवर ऊपस्थित राहून त्यांनी अगदी सोप्या पद्धतीने प्रशिक्षण दिले असून असे प्रशिक्षण घेण्याचे भाग्य कैडेटसना लाभले आहे.
कर्नल ए. डी. स्वामी (VSM) यांच्या मार्गदर्शनाखाली ओपनिंग ऍड्रेस प्रोग्रॅम पार पडला. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सीमा सापळे यांनी उपस्थित राहून कॅडेट्सना प्रोत्साहित केले आणि कॅम्पसाठी शुभेच्छा दिल्या. यादरम्यान ५ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे पीआय स्टाफ उपस्थित राहून त्यांनी पाच दिवस कॅडेटसना प्रशिक्षण दिले. याप्रसंगी कॅम्प मध्ये ड्रिल, हेल्थ अँड हायजीन, वेपन ट्रेनिंग, मॅप रिडिंग, फील्ड क्राफ्ट, बॅटल क्राफ्ट, कम्युनिकेशन स्किल, एनसीसीचे योगदान, असे कॉमन सब्जेक्ट आणि स्पेशल सब्जेक्ट याविषयी सविस्तर माहिती दिली त्याचबरोबर त्याचा सराव करून घेतला. अशा रीतीने पाच दिवसांचा ‘बी’ सर्टिफिकेट देणाऱ्या कैडेटसचा कॅम्प पार पडला.
मेजर डॉ. उर्मिला सरकार यांनी संपूर्ण कँम्पचे संचल केले व प्रशिक्षण शिबिरादरम्यान महत्त्वाची भूमिका पार पाडली. या कँम्पसाठी ले. पदमा माने व ले. डॉ. वनश्री फाळके उपस्थित होत्या .















