मुंबई, १३ जानेवारी २०२५ – नायरा एनर्जी लिमिटेड या भारतातील आघाडीच्या इंटिग्रेटेड डाउनस्ट्रीम तेल कंपन्यांपैकी एक असलेल्या आणि सर्वात मोठ्या खासगी फ्युएल नेटवर्क कंपनीला आशियातील प्रतिष्ठित टाटा मुंबई मॅरेथॉनच्या (TMM २०२५) २०व्या आवृत्तीसाठी भागीदारी केल्याचे जाहीर करताना आनंद होत आहे. कंपनी या मॅरेथॉनची अधिकृत ‘फ्युएल्ड बाय’ पार्टनर असेल. प्रोकॅम इंटरनॅशनलद्वारे प्रमोट केली जाणारी ही रेस जगातील आघाडीच्या १० मॅरेथॉन्सपैकी एक गणली जाते. या भागीदारीमुळे नायरा एनर्जीची भारताच्या घोडदौडीला चालना देण्याची आणि त्याच दरम्यान आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी नागरिकांना प्रेरणा देण्याची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.
या भागीदारीविषयी नायरा एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलेसांड्रो डेस डोरिडेस म्हणाले, ’२०व्या टाटा मुंबई मॅरेथॉनसह अधिकृत फ्युएल्ड बाय पार्टनर म्हणून भागीदारी जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. ही भागीदारी नायरा एनर्जीची भारताच्या महत्त्वाकांक्षेला चालना देत, विकासाच्या नव्या लाटेला बळ देण्याची बांधिलकी दर्शविणारी आहे. आमच्या मते, भारताची प्रगती होईल, तसे नागरिकांनाही निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करणे आणि धावण्यामुळे त्यांच्या एकंदर स्वास्थ्यावर होणारा सकारात्मक परिणाम अनुभवणे आवश्यक होणार आहे.’
TMM च्या प्रतिष्ठित भागीदारांमध्ये नायरा एनर्जीचे स्वागत करताना प्रोकॅम इंटरनॅशनलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक विवेक सिंग म्हणाले, ‘२००४ मध्ये स्थापना झाल्यापासूनच टाटा मुंबई मॅरेथॉन बदल घडवून आणत आहे आणि मॅरेथॉनमध्ये भारताला जागतिक स्तरावर स्थान मिळवून देत आहे. आज आमचे फ्युएल्ड बाय पार्टनर म्हणून नायरा एनर्जीचे स्वागत करताना आणि आरोग्य व खेळाबाबत सुजाण असणारा समाज उभारत बदलाला प्रेरणा देण्याचे टाटा मुंबई मॅरेथॉनच्या ध्येयाला पाठिंबा देताना आम्हाला आनंद होत आहे.’
धावण्याचा आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे संघभावना, शिस्त आणि उद्दिष्ट साध्य करण्याच्या भावनेला चालना मिळते. ऊर्जा कंपनीसह करण्यात आलेल्या या अशा प्रकारच्या भागीदारीमुळे नव्या युगाच्या, महत्त्वाकांक्षी राष्ट्राला आणखी बळ मिळेल आणि जगभरात विकासाच्या नव्य लाटेला ऊर्जा देणे शक्य होईल.
या भागीदारीच्या माध्यमातून नायरा एनर्जीने नव्या भारतासह असलेले नाते बळकट करण्याचे आणि समाजामध्ये फिटनेसविषयी जागरूकता पसरविण्याचे, तसेच एकी व चिकाटीची वृत्ती रुजविण्याचे ध्येय ठेवले आहे.
टाटा मुंबई मॅरेथॉनची २०वी आवृत्ती रविवार, १९ जानेवारी २०२५ रोजी होणार असून, प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून त्याची सुरुवात होणार आहे.