नागपूर : गडचिरोली येथे भूसुरुंग स्फोटात जखमी झालेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या जखमी जवानांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज क्युअर इट रुग्णालयात जावून भेट घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम्, विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान शरद शेलार, परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त रविंद्रसिंह परदेशी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जखमी जवानांची आस्थेवाईक़पणे चौकशी केली. तसेच त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांशी चर्चा करुन त्यांच्यावरील औषधोपचाराबद्दल माहिती जाणून घेतली.
बुधवारी पोलिस आणि सी-६० चे कमांडो गस्त घालत असताना हेमलकशापासून ५ किलोमीटर अंतरावर नक्षलवाद्यांनी पेरुन ठेवलेल्या भूसुरुंग स्फोटात एका पोलीस उपनिरीक्षकासह २० जवान जखमी झाले. त्यापैकी १८ जवानांवर नागपूर येथील क्युअर ईट रुग्णालयात उपचार सुरु आहेत.