मुंबई, (निसार अली) : नौदल सप्ताहानिमित्त मालाड पश्चिमेतील आयएनएस हमला येथील नौदल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कुटुंबियांसोबत मार्वे ते अकसा समुद्र किनाऱ्यावर सफाई केली. तसेच मार्वे रोड व आजूबाजूच्या परिसराची ही स्वच्छता मोहीम राबविली.
दालमीया कॉलेज, इस्माईल युसूफ , एनएल आणि मजिठीया कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सहभाग नोंदवला. सुमारे 1300 जण या मोहिमेत सहभागी झाले होते. नौदल आणि सामान्य नागरिकांत सुसंवाद साधणे, हा यामागील उद्देश होता.
4 डिसेंबर पासुन सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिर घेण्यात आले. सुमारे 500 नौदल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कुटुंबासह रक्तदान केलं. तसेच वृक्षारोपण, चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली.