रत्नागिरी (आरकेेजी) : नौदलाचं ‘हिस्टेरीया 2017 हे भारतातलं पहिलं प्रदर्शन सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख मधल्या पी एएस बने इंटरनॅशनल स्कुलमध्ये भरलं आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी रत्नागिरीकरांची या ठिकाणी मोठी गर्दी पहायला मिळत आहे.
भारताच्या नौसेनेचा इतिहास पुढच्या पिढीला कळावा यासाठी नौदलाची सामुद्रिक इतिहास संस्था प्रयत्नशिल आहे. नौसेनेचा इतिहास सांगणारे हिस्टोरिया २०१७ हे भारतातील पहिलेच प्रदर्शन भरवण्याचा मान देवरूखच्या पी एस बने इंटरनॅशनल स्कुलला मिळाला आहे. आजपासून सुरु झालेलं हे प्रदर्शन उद्यापर्यंत सुरु राहणार आहे.
या हिस्टोरिया २०१७ मध्ये नौसेनेच्या इतिहासाच्या साक्षी देणाऱ्या युद्धात एअर गन इथं प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. सर्वात छोटं बाॅम्ब टाकणारे मिसाईल इथलं मुख्य आकर्षण आहे.
या प्रदर्शनात भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धातील अनेक आठवणी आहेत. त्यापैकी एक म्हणजे 1971 साली ज्यावेळी युद्ध झालं, त्यावेळी पाकिस्तानची गाझी हि युद्ध नौका बेचिराख झाली. या पाणबुडीच्या मुख्य दरवाज्याचे झाकण या प्रदर्शनात ठेवण्यात आलं आहे. तसेच्या प्रदर्शनात सर्वात छोटं बाॅम्ब गोळा करणारे मिसाईल,नौदलाच्या बोटींवर असलेली सर्वात छोटी तोफ, १९८२ सालात भारतीय नौसेनेने अरटार्टिंका बेटावर फडकवलेला भारताचा झेंडा त्याचप्रमाणे नौसेनेनं विविध युद्धात वापरलेल्या एअर गन हे या पर्दर्शनाचं प्रमुख वैशिष्ठ म्हणाव्या लागतील. तर आएनएस गोदावरी या युद्धा नौकेच्या विविध आढवणींना या प्रदर्शनातून उजाळा दिला गेलाय. भारतातील या हिस्टोरिया 2017 चे प्रदर्शन पाहण्यासाठी बच्चे कंपनींनी गर्दी केली आहे.