मुंबई, (निसार अली) : मढ बेट येथील भाटी गावात आज भारतीय नौदलाच्या आयएनएस हमला या केंद्राने गरीब आणि गरजू ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य शिबीर राबविले. नौदल अधिकारी कमांडर विनय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर घेण्यात आले. निस्वार्थ भावनेने समाजाची सेवा हा उद्देश शिबीर घेण्यामागे होता.
भाटी मच्छीमार ग्राम विकास मंडळ आणि वरिष्ठ नागरिकांनी यांनीही यात सहभाग घेतला. रुग्णांच्या चाचण्या करुन त्यानुसार मोफत औषधे देण्यात आली. महिला रोग तज्ञ, दंत तज्ञ, बालरोग तज्ञ आणि सर्वसाधारण आजात विशेषज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. ३५० ग्रामस्थांनी शिबिरात सहभाग नोंदवला.