मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या नवनीत एज्युकेशन सोसायटीच्या रात्र महाविद्यालयाच्या पदवीधर विद्यार्थांचा पदवीदान सोहळा नुकताच एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.
डॉ. सोहेल लोखंडवाला, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.दिनेश कांबळे, इंडिया टूडे वेब वाहिनेचे संपादक सौरभ द्विवेदी, शिवसेना आमदार सुनील शिंदे, डी विभाग कार्यालयाचे सहायक मनपा आयुक्त विश्वास मोटे, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. सहाय, विश्वस्त कमलेश मिश्रा यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पदवीचे वाटप करण्यात आले. विद्यार्थांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.