
देवेंद्र फडणवीस हे बहुजनांचे नेते, १८ पगड जातींना सोबत घेऊन चालणारे, रोहित पवारांना प्रत्युत्तर
मुंबई : औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे. विविध पक्षांना संपर्क करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्याने त्यांचे डोके ठिकाणावर नाही. मविआच्या नेत्यांना संपर्क केला की संजय राऊतांची चिडचिड वाढते. महाराष्ट्रातील मविआची पळताभुई थोडी होणार हे निश्चित आहे. देवेंद्र फडणवीस यांची चाणाक्यगिरी आपण राज्यसभा निवडणुकीत आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत पाहिली आहे. त्याचमुळे संजय राऊत घाबरले आहेत. अशी घणाघाती टीका भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे.
महाराष्ट्राचे पहिले नागरिक म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यायला हवा होता, मात्र संजय राऊत ते करणार नाहीत. राजकारणात सौजन्य दाखवावं लागतं, पण उबाठात संजय राऊत यांची जी इज्जत राहिली, ती उरलेलीसुद्धा आता जाणार आहे. मविआचा पत्त्यांचा बंगला कोसळणार आहे. तुमचे खासदार इन्टॅक्ट राहतात का, हे आधी बघा. असा टोला संजय राऊत यांना लगावला.
संजय राऊत पाकिस्तानचे प्रवक्ते, सैनिकांचा अपमान, माफी मागा
भारतानं पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून बदला घेतला, तरी अभिमान बाळगण्याऐवजी संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते असल्यासारखी भाषा करतात. भारतीय सैन्याने घरात घुसून दहशतवाद्यांना ठार केलं, तरी तुम्ही म्हणता ते जिवंत आहेत. हा सैन्याच्या शौर्याचा अपमान आहे, संजय राऊत यांनी नाक घासून माफी मागितली पाहिजे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उबाठा गटाने वीर सैनिकांचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी. अशी मागणी नवनाथ बन यांनी केली.
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत भारताची स्पष्ट भूमिका आहे – ना पाकिस्तानचे खेळाडू भारतात येणार, ना भारत पाकिस्तानात जाणार. करार आणि आशिया कपचे स्वरूप वेगळे असले तरी राष्ट्रवाद काय असतो हे संजय राऊत यांनी शिकवू नये. जावेद मियादादला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकवण्याची गरज नाही. असा टोला त्यांनी लगावला
सुनेत्रा पवार व संघ :
सामाजिक आणि वैचारिक अस्पृश्यता संपली पाहिजे. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करतो. महात्मा गांधी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एपीजे अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी हे सुद्धा संघाच्या व्यासपीठावर आले होते. संघ अस्पृश्यता दूर करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. मग शरद पवार गटाला आणि रोहित पवार यांना संघामुळे एवढी मिर्ची का लागते? रोहित पवार यांनी संघाचा इतिहास समजून घ्यावा. एका धर्मियाचे लांगूलचालन करण्यापेक्षा संघाच्या व्यासपीठावर येणे समाजासाठी चांगले आह
रोहित पवार – ब्राह्मण महामंडळ आरोप
देवेंद्र फडणवीस हे बहुजन समाजाचे नेते आहेत. १८ पगड जातींना सोबत घेऊन जाण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. एका वर्तमानपत्राने खोटी बातमी दिली आहे. सर्वच महामंडळांना समान वागणूक आणि निधी देण्याचे काम महायुती सरकार करत आहे. आमचे काम सबका साथ, सबका विकास या तत्वावर आधारित आहे. तरीसुद्धा रोहित पवार जाणीवपूर्वक खोटी टीका करत आहेत.















