रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून नात्यातील तरुणाने ९ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. गुहागर तालुक्यातील पांगारी तर्फे हवेली सडेवाडी येथे ही घटना घडली. संशयित तरुणाने मे २०१७ ते २९ ऑगस्ट २०१७ या कालावधीत विद्यार्थीनीच्या राहत्या घरी हा प्रकार केल्याचे पिडीत विद्यार्थीनीने पोलीसांना सांगितले.
पंकज पांडुरंग पाटील (२०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. पिडीत विद्यार्थीनी पांगारीतर्फे हवेली सडेवाडी येथे इयत्ता ९ वीत शिक्षण घेत आहे. याच गावातील पिडीत विद्यार्थीनीच्या कुटुंबा शेजारी राहणारा पंकज पाटील हा विद्यार्थीनीचा नातेवाईक आहे. पंकज याने पिडीत विद्यार्थीनीला लग्नाचे आमिष दाखवून मे २०१७ चे २९ ऑगस्ट २०१७ या कालावधीत तिच्या राहत्या घरी बलात्कार केल्याचे या पिडीत विद्यार्थीनीने पोलीसांत सांगितले.
पोलीसांनी या प्रकरणी पंकज पाटील याच्यावर लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा भा.दं.वि. कलम ३७६, २, (आय), (एन), ५०६ आदी २०१२ चे कलम ४,६, ८,१० नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पो.नि. देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप जाधव करत आहेत.