रत्नागिरी दि.20:- दि महाराष्ट्र स्टेट ऑप मार्केटिंग फेडरेशन लि. व जिल्हा पणन कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने जिल्ह्यात नवीन हंगामातील भात खरेदी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 14 धान्य खरेदी केंद्रावर धान्याची खरेदी करण्यात येणार असून याकरीता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत नाव नोंदणी करावयाची आहे. खेड तालुका खरेदी विक्री संघ लि, केळशी परिसर आंबा उत्पा. सहकारी मर्यादित, दापोली तालुका खरेदी विक्री संघ लि, गुहागर तालुका खरेदी विक्री संघ लि, चिपळूण तालुका खरेदी विक्री संघ चिपळूण, शिरळ विविध कार्यकारी सेवा सोसायटी शिरळ भागाडी, शिरगाव गट विविध कार्यकारी सेवा सोसायटी शिरगाव, रत्नागिरी जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा संघ लि. रत्नागिरी, लांजा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. लांजा, राजापूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. राजापूर येथे भात खरेदीसाठी नाव नोंदणी सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी भात पिकांची नोंद असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आदी कागदपत्रासह संबंधित केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.














