मालाड, ता.20 (बातमीदार) : राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचा वाढदिवस मार्वे रोड येथील स्नेहा सागर आश्रमात साजरा करण्यात आला. आश्रमातील चिमुकल्यांना भेट वस्तू देण्यात आल्या. तसेच केकही कापण्यात आला. उत्तर मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष इंद्रापाल सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. मालाड तालुकाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. आयोजक परशुराम शर्मा, महिला तालुका अध्यक्षा ज्योती भैसारे, प्रकाश कोठारी, दत्ताराम कानाडे, रिजवान खान, विनोद हिंगु,सुबोध कवटकर, वैशाली शेट्टी उपस्थित होते.