
मुंबई, (निसार अली) : मढ समुद्र किनार्याजवळ नांगर टाकून ठेवलेली एक मासेमारी नौका खडकावर आदळून फुटल्याची घटना आज 29 एप्रिल रोजी घडली. जोराने वाहणार्या वार्यांमुळे नांगर खचल्याने विष्णु लक्ष्मण कोळी यांची ‘आई वेलंकणी’ ही नौका खडकावर आदळली. ती फुटल्याने मच्छिमार विष्णु कोळी यांच्यावर उपासमारिची वेळ आली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची शासनाची मदतही मिळणार नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
ऑल इंडिया फिशरमेन्स कांग्रेसचे संतोष कोळी यांनी मत्स्य व्यवसाय आयुक्त तसेच मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांना पत्र लिहून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच मढ किनार्याजवळ समुद्रात असलेला खड़क हटविण्याची मागणी केली आहे.














