रत्नागिरी, (आरकेजी) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आयोजित ५७ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी रत्नागिरी केंद्रावर ६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. स्वा. सावरकर नाट्यगृहामध्ये २३ नोव्हेंबरपर्यंत १९ नाटकांचे प्रयोग होणार आहेत.
रत्नागिरी हे राज्य नाट्यस्पर्धांच्या प्राथमिक फेरीचे केंद्र झाल्यापासून नोव्हेंबरमध्ये स्पर्धांची प्रतिक्षा रसिकांना असते. यंदा ही स्पर्धा ६ नोव्हेंबरपासून सुरू होत असून, पहिले नाटक कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे बिकट वाट वहिवाट (व्यंकटेश माडगुळकर) हे आहे. ७ नोव्हेंबर रोजी कणकवलीच्या वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे मागच्या बेंचवरची मुलगी (अनिल दांडेकर), ८ रोजी श्रीरंग, रत्नागिरीचे वरचा मजला रिकामा (आत्माराम सावंत), ९ रोजी केळकर महाविद्यालय, देवगडचे ब्रेकिंग न्यूज (विद्यासागर अध्यापक), १० रोजी श्री देवी जुगाई कलामंच, कोसुंब, संगमेश्वरचे मन कोवळे उन्हाचे (सुनील जाधव), ११ रोजी संकल्प कलामंचचे मी इतिहास गाडला नाही (सुहास भोळे), १३ रोजी खल्वायन, रत्नागिरीचे कॉफी (महेंद्र तेरेदेसाई), १४ रोजी साईकला कला क्रीडा मंच, सिंधुदुर्गचे अशुध्द बीजापोटी (केदार देसाई), १५ रोजी सहयोग, रत्नागिरीचे अतर्क्य (सुबोध हर्डीकर), १६ रोजी ओम साई मंडळ मिरजोळे, रत्नागिरीचे ती रात्र (हेमंत एदलाबादकर), १७ रोजी नेहरूबुवा कलादर्शन नाट्यमंडळ पालीचे कुणी तरी आहे तिथं (सुरेश खरे), १८ रोजी संगमेश्वर तालुका सांस्कृतिक कलामंच, देवरूखचे ती रात्र (हेमंत एदलाबादबर), २० रोजी कलावलय, वेंगर्लाचे निखारे (रत्नाकर मतकरी). ही नाटके सायं़७ वा़ सुरू होणार आहेत. तर २१ रोजी स.११.३० वा. रत्नसिंधु, सामाजिक व शैक्षणिक विकाससेवा संस्था, हातखंबाचे येस, माय डियर (श्रीनिवास हर्डिकर), सायं. ७ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर स्मृती प्रतिष्ठान, चिपळूणचे कोर्ट मार्शल (मंदार काळे), २२ रोजी स. ११.३० वा. बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाचे कॅप्टन (सोमनाथ सोनवलकर), सायं. ७ वा. बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळचे एकदा पहावं न करून (योगेश सोमण), २३ रोजी स. ११.३० वा. आभार सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, रत्नागिरीचे अल्बम (चंद्रशेखर मुळे), सायं. ७ वा. अक्षरसिंधु साहित्य कलामंच, सिंधुदुर्गचे भावीण (विजय चव्हाण) यांचे नाटक सादर होणार आहे.