पत्रकारांच्या सन्मानासाठी झगडणारी एनयुजे इंडिया शी संलग्न असणारी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्रची कार्यकारिणी एनयुजे इंडिया चे उपाध्यक्ष व एनयुजे महाराष्ट्रचे मार्गदर्शक शिवकुमार यांनी जाहीर केली. हिचा कार्यकाल दोन वर्षाचा आहे.एनयुजे महाराष्ट्रच्या अध्यक्षपदाची जबाबदारी शीतल करदेकर (ग्लोबल गर्व्हन्स न्यूज ग्रुप, मुंबई) यांच्यावर सोपविण्यात आली आहे.एनयुजे महाराष्ट्राच्या कार्यकारणीत सरचिटणीस – सीमा भोईर (लोकसत्ता, मुंबई), खजिनदार- वैशाली अाहेर (दैनिक व साप्ताहिक रामदीप वृत्तपत्र, मुंबई),उपाध्यक्षपदी मिलिंद भागवत (न्यूज 18 लोकमत, मुंबई), संतोष माऴकर (आपले महानगर, मुंबई), घनश्याम गोसावी (दैनिक वृत्तमानस, मुंबई), आणि प्रवीण नारायण भोगले (टाइम्स नाऊ) अशी दिग्गज मंडऴी असून सचिवपदी – नमिता (स्टार इंडिया, मुंबई), पूनम मिश्रा (दिव्य भास्कर,औरंगाबाद), महेंद्र जगताप (समग्र भारत ,नँशनल न्यूज पेपर दिल्ली) आणि राजेंद्र जाधव (टीव्ही 9 चॅनेल,धुऴे) असूनसहसचिवपदी सतीश रूपवते (जे अँड के न्यूज,नाशिक), राजेंद्र मकोटे (तरुण भारत,कोल्हापूर) आणि शर्वरी जोशी (लोकसत्ता ऑनलाइन मुंबई) तरआयोजन सचिवपदी विशाल सावंत (पोलिस टाइम्स) आणि कैलास उदमले (सामाईक चौथी दुनिया)आणि प्रवक्ते म्हणून शिल्पा देशपांडे (न्यूज नेशन,पुणे ) व संदीप टक्के ( आपले महानगर ,मुंबई जबाबदारी सांभाऴणार आहेत कार्यकारिणी सदस्य पदी आनंद शर्मा (इंडिया आपतक समाचार, जळगाव), स्वप्निल शिंदे (नवभारत,मुंबई)मंगेश म्हात्रे (ग्लोबल टाइम्स, मुंबई), संतोष राजदेव (साप्ताहिक वार्तादिप नवीमुंबई), ताराचंद म्हस्के (महाराष्ट्र टाइम्स,अहमदनगर), दौलत नाईक (पुण्यनगरी, सातारा), रचना सकपाळ (महाराष्ट्र वन, चॅनेल, रायगड), रोहिणी साळुंखे (पुढारी, मुंबई), संदीप मोरे (न्यूज 18 लोकमत, मुंबई), राकेश गुडेकर (इनाडू पोर्टल, रत्नागिरी), प्रताप मेटकरी (सकाळ, सांगली), राजमल जैन (साप्ताहिक सातपुडा पर्वत, नंदुरबार), भगवान परऴीकर(सामना सोलापूर), प्रीती रिटा (मिड डे, गुजरात समाचार, मुंबई), मनीषा मराठे ( हिंदुस्थान, अमरावती) आणि संजना कपूर-गांधी (महानगरी जनप्रवास)अशी दिग्गज मंडऴी या कार्यकारिणीची जबाबदारी सांभाऴणार आहेत .येत्या दोन वर्षात ही कार्यकारिणी आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकारिणी पत्रकार सन्मानासाठी सक्षमीकणासाठी काम करताना सामाजिक बांधिलकी जपत लोकहिताची कामे करण्यात अग्रेसर राहील असा विश्वास नवनियुक्त अध्यक्ष शीतल करदेकर यांनी व्यक्त केला.