रत्नागिरी (आरकेजी): शिवसेनेत येण्याची ऑफर मिलिंद नार्वेकरांनीच दिली होती, असा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी आज रत्नागिरीमध्ये केला आहे. पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
गेले काही दिवस नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दरम्यान राणे यांनी आपल्या अनेक पक्षांकडून ऑफर होत्या. शिवसेनेकडूनही आपल्याला त्यांच्या पक्षात येण्याची ऑफर होती, असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. याबाबत निलेश राणे यांना विचारलं असता, मिलिंद नार्वेकर यांनीच शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती, असा खुलासा निलेश राणे यांनी केला. शिवसैनिकांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी मिलिंद नार्वेकरांना विचारावं, का आणि कशासाठी ऑफर दिली हाती ते, असा सवालही त्यांनी यावेळी केला.