रत्नागिरी दि.18:- ०८ मार्च २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाव्दारे नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सदर पुरस्कार महिला / संस्था यांनी महिलांच्या कल्याणाकरीता / विकासाकरिता केलेल्या कामासाठी दिला जातो.
जिल्हयातील नारी शक्ती पुरस्कारा साठी पात्र इच्छुकांनी मार्गदर्शक सुचनेनुसार नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज / नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने www.awards.gov.in वेबसाईटवर दिनांक 31 जानेवारी 2022 पर्यत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रत्नागिरी यांनी केले आहे.